Satara Lockdown : साताऱ्यात 25 मेपासून 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन ; काय सुरु काय बंद?

Continues below advertisement

Satara Lockdown : सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. अशातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू असला तरी, कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. 

सातारा जिल्ह्यातही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 25 मेपासून ते 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. 24 मे रोजी रात्री 12 वाजता लॉकडाऊन सुरु होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, लॉकडाऊन काळात भाजीपाला, फळ मार्केट, किराणा विक्री, उपहारगृह, बार, लॉज सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः राहणार बंद आहेत. तसेच लग्न आणि अंत्यविधीला जाणासाठी आता कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणं बंधनकारक असणार आहे. त्याचसोबत लसीकरण झाल्याचं प्रणाणपत्रही बंधनकारक असणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram