Devendra Fadnavis Satara Doctor Suicide: डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोषींना सोडणार नाही - फडणवीस
Continues below advertisement
पुण्यात माजी आमदार रवींद्र धनगेकर (Ravindra Dhangekar) आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत, तर दुसरीकडे सातारा येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. 'डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्वॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही,' असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणालाही वाचवले जाणार नाही असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, रवींद्र धनगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर निवडणूक प्रतिज्ञापत्राचा हवाला देत ॲट्रॉसिटीसारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याचा दावा केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement