Neelam Gorhe Satara Doctor Case : डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणी वरिष्ठ स्तरावरून पोलीस चौकशी करणार
Continues below advertisement
साताऱ्यात एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे, या प्रकरणी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'माणूस जेव्हा मृत्युमुखी पडतो, तेव्हा त्याने लिहिलेल्या गोष्टी कोर्टातही सत्य मानल्या जातात,' असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी प्रकरणाचं गांभीर्य अधोरेखित केलं. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणी सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ स्तरावरून या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचेही गोऱ्हे यांनी सांगितले. आत्महत्येपूर्वी डॉक्टर तरुणीने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये पोलिसावर बलात्काराचा आणि मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख असल्याने या प्रकरणाची फॉरेन्सिक चौकशी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement