Kurnool Bus Tragedy: 'अपघात धक्कादायक', CM Chandrababu Naidu; मृतांचा आकडा १५ वर पोहोचला
Continues below advertisement
आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) कर्नूल (Kurnool) जिल्ह्यात झालेल्या भीषण बस अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू (CM N. Chandrababu Naidu) यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 'कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना तेकूर गावाजवळ झालेला बस अग्नितांडवाचा अपघात धक्कादायक आहे,' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हैदराबादहून बंगळुरूला निघालेल्या खासगी कावेरी ट्रॅव्हल्सच्या (Kaveri Travels) बसला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. एका दुचाकीस्वाराला धडकल्यानंतर बसच्या इंधन टाकीचा स्फोट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या बसमधून ४२ प्रवासी प्रवास करत होते, त्यापैकी किमान १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताच्या दुःखद आठवणी ताज्या झाल्या आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement