Satara Doctor Case: 'हे तुमच्या डिपार्टमेंटचं फेल्यूअर', Sushma Andhare यांचा सातारा पोलिसांवर हल्लाबोल
Continues below advertisement
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे (Doctor Suicide Case) खळबळ उडाली असून, पोलीस तपासावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी (SP Tushar Doshi) यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. 'हे फलटणचं फेल्यूअर आहे, हे आपल्या डिपार्टमेंटचं फेल्यूअर आहे, हे सातारा पोलिसांचं फेल्यूअर आहे आणि हे इथल्या आमदार खासदारांचं पण फेल्यूअर आहे,' अशा शब्दात अंधारे यांनी व्यवस्थेच्या अपयशावर बोट ठेवले आहे. फलटणमधील इतर ५ ते ६ हत्या प्रकरणांमध्ये आरोपी मोकाट असूनही पोलीस चार्जशीट दाखल करू शकलेले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. एका महिलेवर झालेल्या अत्याचारावेळी पोलीस अधिकारी तुषार दोषी यांनी आपला सद्सद्विवेक का वापरला नाही, असा संतप्त सवाल विचारत अंधारे यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या पारदर्शक चौकशीची मागणी केली. या प्रकरणामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement