Car Accident | महाबळेश्वरमध्ये प्रेमीयुगुलाची कार थेट हॉटेलमध्ये घुसली | ABP Majha

हाबळेश्वरात फिरायला आलेल्या प्रेमीयुगलाची गाडी थेट हॉटेलमध्ये घुसल्याची घटना रात्री घडली. पुण्यातील प्रेमीयुगुल आपण कोणाला दिसू नये म्हणून स्वत:च्या गाडीने महाबळेश्वरात आले. दिवसभर महाबळेश्वर फिरुन झाल्यावर दोघही परतीच्या मार्गावर जाण्यासाठी आठ वाजता निघाले. परतीच्या मार्गावर असताना गाडी सुसाट होती. वेण्णालेक परिसरातून खालच्या वळणावरुन गाडीने वेग धरला आणि घात झाला. चालक प्रियकराचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी थेट जेवी गार्डन हॉटेलमध्ये कठडा तोडून घुसली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola