Nagpur Winter Session | गरिबांना तीनचाकी रिक्षाच परवडते,सभागृहातील पाहिल्याच उत्तरात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी | ABP Majha
"कमी बोलायचं आणि काम जास्त करायचं," अशी आपली भूमिका असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या अभिभाषणाला विधानसभेत उत्तर दिलं. सभागृहातील पहिल्याच उत्तरात मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्या अनेक आरोप आणि टीकांवर जोरदार फटकेबाजी केली.वि धीमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे.