Satara Bavdhan Bagad Yatra : कोरोनावर मात, बगाड यात्रा जल्लोषात, बगाडची परंपरा काय?
Continues below advertisement
बावधनच्या यात्रेला होळी पौर्णिमेपासून सुरुवात होते, तर रंगपंचमीदिवशी येथे बगाड भरतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक ही यात्रा पाहण्यासाठी येतात. बावधनच्या बगाड यात्रेसाठी फक्त खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे. बावधन येथील यात्रेत जे बगाड वापरले जाते त्याचं वजन तब्बल २ ते ३ टन इतके असते. बागडाला दगडाची चाके, दगडी चाकावर कणा, कण्यावरती बूट, बुट्यावरती वाघ, वाघावरती खांब, खांबावरती शीड अशी बगाडाची रचना असते.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Satara Marathi News ABP Maza Bavdhan Bagad Yatra Bavdhan Bagad Yatra Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Bagad Bawdhan