Satara ATM Blast : साताऱ्यातील चोरांचा प्रताप, जिलेटीन काड्यांनी फोडणार होते ATM?

साताऱ्याच्या कराडमध्ये चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी आणलेल्या जिलेटीनच्या कांड्या बॉम्ब शोधक पथकाने निकामी केल्यात. या जिलेटीनच्या स्फोटामुळे परिसर हादरलाय. कराडच्या गजानन हाऊसिंग सोसायटी परिसरात बँक ऑफ इंडियाचं एटीएम आहे. काल मध्यरात्री ४ चोरटे एटीएम लुटण्याच्या प्रयत्न करत होते. याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांच्या डोळ्यात स्प्रे फवारुन तिघे चोर पसार झाले. तर, एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या चोरट्यांनी एटीएममध्ये जिलेटीन ठेवल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केलं. या पथकानं एटीएममध्ये स्फोट करुन जिलेटीन निकामी केलंय. मात्र, हे जिलेटीन मोठ्या प्रमाणात असल्यानं स्फोटाच्या वेळी मोठा आवाज झाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola