Satara ambeghar Landslide : NDRF पोहोचण्याआधीच स्थानिकांकडून मदतकार्य सुरु

Continues below advertisement

साताऱ्यावर मुसळधार पाऊस काळ बनून कोसळला. सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात ६ ठिकाणी दरड कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. पण दुर्दैव असं की घटना घडून  ४2 तास उलटून गेले मात्र अजूनही आंबेघरमध्ये मदत पोहचू शकली नाहीये. तर मिरगावात तोकडी मदत पोहचू शकलेय. आंबेघऱ गावात जायच्या रस्त्यावर पाण्याचा प्रवाह मोठा असल्यानं काल दिवसभर प्रयत्न करूनही एनडीआरएफ आणि प्रसासकीय अधिकारी आंबेघर गावात पोहचू शकले नाहीत. गावात अजनही १४ जण दरडीखाली अडकल्याची भीती व्यक्त होते. तर इकडे मिरगावात मदत पोहोचली पण ती तोकडी आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram