Pune Case Sassoon Hospital : मंत्र्याचं नाव घेणं भोवलं? ससूनचे डीन विनायक काळे सक्तीच्या रजेवर!
पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिग प्रकरणाला आता नवं मिळालं आहे. या प्रकरणानंतर ससून रुग्णालयातील बेताल (Pune Porsche car accident) कारभार समोर आला आहे. त्यातच आता या प्रकरणात ससून रुग्णालय आणि डॉ. अजय तावरे हे रडारवर आहे. या प्रकरणासंदर्भात डॉ. विनायक काळेंनी पत्रकार परिषद घेत प्रकरणासंदर्भात आणि तावरे यांच्या नियुक्तीसंदर्भात माहिती दिली. हिच पत्रकार परिषद विनायक तावरेंना चांगलीच भोवल्याचं दिसत आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी हसन मुश्रीफांचं नाव घेतलं आणि त्यांच्यावर कारवाई करत संध्याकाळी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं.
डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याने त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांचं निलंबनदेखील करण्यात आलं. अजय तावरेंचे ससून रुग्णालयातील कारनामे सर्वश्रृत आहेत. सरकारलादेखील ते माहित आहे. मागील 17 वर्षात तावरेंनी एकनाअनेक कारवाने ससून मध्ये विविध पदावर एन्ट्री मिळवली. त्यानंतर आता ही झालेली त्यांची नियुक्तीसाठी आमदार सुनिल टिंगरेंच्या शिफारस होती. त्यानंतर हसन मुश्रीफांनी तावरेंनी नियुक्ती केली होती.