Horse market : देशातील सर्वात जुन्या सारंगखेडा घोडेबाजाराला 21 डिसेंबरला सुरुवात : ABP Majha
Continues below advertisement
देशातील सर्वात मोठा अश्वबाजार म्हणून इतिहासकालीन नोंदी असलेल्या सारंगखेडा इथल्या घोडेबाजाराला २१ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या घोडेबाजाराचं खास वैशिष्ट्य असलेल्या चेतक फेस्टिवलची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षीच्या फेस्टिवलचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी होणाऱ्या अश्व स्पर्धा आणि प्रीमियर लीग. देशभरातून घोडे विक्रीसाठी इथे दाखल होत असतात. घोड्यांच्या खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल होत असते. आतापर्यंत जवळपास ७०० पेक्षा अधिक घोडे दाखल झाले आहेत.
Continues below advertisement