Santosh Deshmukh postmortem | संपूर्ण शरीर काळंनिळ, अंगावर जखमा, देशमुखांचा शवविच्छेदन अहवाल समोर
Santosh Deshmukh postmortem | संपूर्ण शरीर काळंनिळ, अंगावर जखमा, देशमुखांचा शवविच्छेदन अहवाल समोर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येची तीव्रता उघड झालेल्या फोटोतून जगासमोर आलीच होती. आता त्यांचा शवविच्छेदन अहवालही एबीपी माझाच्या हाती लागलाय. देशमुखांना हालहाल करून मारण्याचं आल्याचं अहवालातून उघड होतंय. देशमुखांच्या शरीराच्या बहुतांश भागांवर गंभीर जखमा दिसत आहेत. मारहाणीमुळे अंग काळंनिळं पडल्याचं दिसून येतंय. नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण झाल्याचं अहवालात दिसून येतंय.
काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. हे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.