Supriya Sule Santosh Deshmukh Mother:लेकराला स्वयंपाक केला,5 रिंग वाजल्या देशमुखांच्या आईचा टाहो

Continues below advertisement

Supriya Sule Santosh Deshmukh Mother:लेकराला स्वयंपाक केला,5 रिंग वाजल्या देशमुखांच्या आईचा टाहो

Santosh Deshmukh Case : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे मस्साजोगमध्ये दाखल झाले. यावेळी संतोष देशमुख यांच्या आईला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. 

सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर संतोष देशमुख यांच्या आई म्हणाल्या की, संतोष देशमुखने सगळ्या गावाचं चांगलं केलं. त्या दिवशी थोडेफार काही भांडण झाले असतील. तो म्हटला असेल मला मारू नका. पण त्याला संपवून टाकले. माझा जसं लेकरू आहे तसं या मारेकऱ्यांना लेकरू असतील ना. त्यांना मुलं, बायका नसेल का? त्यांनी एवढं का केलं?. मी त्याची आई आहे आज मला काय वाटत असेल? माझं लेकरू खूप चांगलं होतं. मी  आता काय करू? मी माझं लेकरू कुठे शोधू? असे म्हणताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. 

सुप्रिया सुळेंचा देशमुख कुटुंबियांना शब्द 

या प्रकरणातील सर्व आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर पुन्हा आम्ही नंतर जगायचं कसं? असे संतोष देशमुख यांच्या आईने म्हणताच सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी तुम्हाला शब्द देते की मी तुमच्या मुलाला तर परत आणू शकत नाही. मात्र मी तुमच्या नातवांना नक्कीच न्याय देईल. मी तुमच्यासाठी नक्कीच लढेल. यानंतर संतोष देशमुखांच्या आई म्हणाल्या, आम्हाला न्यायाचा हवा आहे. आम्हाला संरक्षण हवे आहे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola