Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरकार अॅक्शन मोडवर ABP Majha

Continues below advertisement

Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरकार अॅक्शन मोडवर ABP Majha बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील सर्व आरोपींवर ३०२सह मकोकाचा गुन्हा दाखल करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बरगळ यांचीही बदली करण्यात आलीय. पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यासोबतच न्यायालयीन चौकशीची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेची पाळंमुळं खोदली जातील असंही मुख्यमंत्री म्हणाले. आरोपी वाल्मिक कराड एका गुन्ह्यात दिसतोच आहे, दुसऱ्यातही सहभाग तपासू असं जाहीर करतानाच वाल्मिक कराडवर कारवाई होणारच असं मुख्यमंत्री म्हणाले. सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत करण्यात आलीय. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram