Santosh Bangar : पोलिसांबरोबरच्या वादानंतर प्रथमच संतोष बांगर एबीपी माझावर

Continues below advertisement

हिंगोलीचे शिंदे समर्थक आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात सापडलेत. मंत्रालयात पोलिसांना शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मंत्रालयात प्रवेश करताना अनेक कार्यकर्ते आमदार बांगर यांच्यासोबत होते. पोलिसांना कार्यकर्त्यांना थांबवून पास काढण्यास सांगितल्यानं आमदार बांगर संतप्त झाले आणि त्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली असा आरोप आहे. तुम्ही मला ओळखत नाही का? असा सवाल करत त्यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येतोय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram