Shegaonच्या Gajanan Maharaj संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त Shivshankar Patil यांची प्रकृती स्थिर

Continues below advertisement

लाखो भक्तांच श्रद्धस्थान असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याने आज दिवासभर समाज माध्यमात अनेक मेसेजेस फिरत होते.. सध्या शिवशंकर पाटील यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलीये. आपल्या नियोजन कौशल्यामुळे जगभरात संत गजानन महाराज संस्थान शिस्त व स्वच्छतेसाठी प्रसिद्ध करणाऱ्या व मॅनेजमेंट गुरू म्हणून ख्याती मिलविलेल्या शेगाव संस्थांचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांची प्रकृती वृद्धापकाळाने बिघडल्याने आज सोशल मीडियात अनेक मेसेज वायरल झालेत. त्यामुळे शेगावात सुद्धा मुख्य बाजारपेठ बंद झाली , रस्ते शुकशुकाट झाले होते. शिवशंकर पाटील यांची प्रकृती स्थिर पण चिंताजनक असून त्यांच्यावर त्यांच्या घरीच एक डॉक्टरांची टीम उपचार करत आहे. शेगावत गर्दी जमू नये ,वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने शेगावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram