Sant Gajanan Maharaj प्रकट दिनाच्या पूर्वसंध्येला शेगावात भक्तांची मांदियाळी, उत्साह शिगेला

Continues below advertisement

शेगावचे श्री गजानन महाराज यांचा आज 144 वा प्रकटदिन आहे. त्यामुळे कालपासूनच शेगावात भक्तांची मोठी गर्दी व्हायला लागली आहे. सकाळी 7 वाजता आरतीनं या उत्सवाची सुरुवात जालेय. कालपासूनच राज्यभरातून दिंड्या शेगावात यायला सुरुवात झालेय. जवळपास दीडशे दिंड्या शेगावात पोहोचल्या आहेत. काल संध्याकाळपासूनच भक्तांची मंदिर परिसरात गर्दी दिसून येतेय. प्रकटदिन सोहळ्याच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक रोषणाईही  करण्यात आलेली आहे. गेले दोन वर्ष कोरोना संकटामुळे हा सोहळा साजरा झाला नव्हता. मात्र यंदा कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं निर्बंधांसह हा सोहळा साजरा करण्यास मान्यता मिळालेय. त्यामुळे भक्तांमध्ये उत्साह आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram