Sanju Rathod Majha Maha Katta :सई ताम्हणकरनेही समोर बसून ऐकला, संजू राठोड माझा कट्टावर भरभरुन बोलला!

Sanju Rathod Majha Maha Katta :सई ताम्हणकरनेही समोर बसून ऐकला, संजू राठोड माझा कट्टावर भरभरुन बोलला!

मी दहावीला असताना मला एक मुलगी आवडायची. तिने मला एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये तिने शायरी वगैरे लिहिली होती. ती खूप विनोदी होती. "चावल का पाणी आँगन मे फेका, मैने मेरे संजू को स्कूल मे देखा", अशी ती शायरी होती. तेव्हापासून मी दोन-चार ओळी लिहायला लागलो. तेव्हा मला एवढं कळायचं नाही. मी तेवढा परिपक्व नव्हतो. तेव्हा केवळ 16 वर्षांचा होतो. मी तिच्या शायरीला उत्तर दिलं की 'फुलं है गुलाब का उसे सुखा मत देना, लडका हूं गरिब का मुझे धोका मत देना," असं गुलाबी साडी (Gulabi Sadi) या गाण्याचा लेखक आणि गायक संजू राठोड (Sanju Rathod) म्हणाला. एबीपी माझाच्या महाकट्ट्यावर (Majha Maha Katta) तो बोलत होता. यावेळी त्याने  लिखाणाला पहिल्यांदा सुरुवात केली, याबाबतचा किस्सा उलगडून सांगितला. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola