Maharashtra Politics : पृथ्वीराज चव्हाणांचा वार, शिरसाट - तटकरेंचा जोरदार पलटवार ABP MAJHA

Continues below advertisement

भंडारा: पृथ्वीराज चव्हाणांना (Prithviraj Chavan) जर वाटतं असेल की 2014 चं सरकार राष्ट्रवादीमुळं (NCP) पडलं असेल तर आज ते राष्ट्रवादीसोबत युती करून का काम करत आहेत असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांनी विचारला आहे. पृथ्वीराज चव्हाण हे स्वतः राष्ट्रवादीच्या मदतीने आमदार झाले आहेत, त्यांचे आरोप म्हणजे एकमेंकांवर चिखलफेक करण्याचं काम आहे, मी यावर फार काही बोलू इच्छित नाही असंही ते म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसने आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही नक्कीच मराठा आरक्षण (Maratha reservation) टिकवलं असतं, असं खळबळजनक वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण  यांनी केलं होतं. आता त्यावर खासदार प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram