Sanjay Shirsat : 'ज्या बडव्यांमुळे सेना सोडली, आज तुम्ही त्यांच्याकडेच जाताय'- शिरसाट
Continues below advertisement
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत्या भेटीगाठींवरून जोरदार टीका केली आहे. 'ज्या बडव्यांमुळे आपण सेना सोडत असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते, आज तुम्ही त्यांच्याकडेच जात आहात,' असा सणसणीत टोला शिरसाट यांनी लगावला. शिरसाट पुढे म्हणाले की, राज ठाकरे एकेकाळी याच शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदींचे कौतुक करत होते, मात्र आता तेच त्यांना दुश्मन वाटू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत सतत होणाऱ्या भेटींवरून राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही ते म्हणाले. मनसेने आता हे सर्व थांबवून आमच्यासोबत यावे, असे आवाहनही शिरसाट यांनी केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement