Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंची उमेदवारी फडणवीसांकडून जाहीर, Sanjay Shirsat यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंची उमेदवारी फडणवीसांकडून जाहीर, Sanjay Shirsat यांची प्रतिक्रिया
कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदेंची उमेदवारी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलीये. कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना महायुतीचे सर्व घटकपक्ष निवडून आणतील, त्यात कुणीही शंका बाळगू नये असं फडणवीस म्हणाले. भाजपच्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. श्रीकांत शिंदे हे कल्याणचे विद्यमान खासदार आहेत. मात्र कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक मतभेद आहेत. श्रीकांत शिंदेंचा प्रचार करणार नाही असा ठराव कालच स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी मंजूर केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची आजची घोषणा अतिशय महत्त्वाची ठरते.
Continues below advertisement