Sanjay Raut on Ajit Pawar Vidhan Bhavan : विधान भवनात अजितदादा-राऊत आमनेसामने आले, काय म्हणाले?
Sanjay Raut on Ajit Pawar Vidhan Bhavan : विधान भवनात अजितदादा-राऊत आमनेसामने आले, काय म्हणाले?
आम्हाला बघून प्रत्येकाला माघारी फिरावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले. जयंत पाटील, चंद्रकांत पाटील, अजित पवार, रमेश चेन्निथला भेटले. चांगलं वातावरण आहे आणि ते तसंच रहायला पाहिजे. महाराष्ट्राचं राजकारण निर्मळ होतं.महाराष्ट्राच्या राजकारणात विषाचा प्रवाह दुर्दैवानं भाजपनं सुरु केला, असं संजय राऊत म्हणाले.
अनिल देशमुख तुरुंगात होते आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार नाकारला गेला होता. निवडणूक आयोग तटस्थ असेल तर गणपत गायकवाड यांना मतदान करु देणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीचे तीन उमेदवार जिंकतील, असं संजय राऊत म्हणाले. इतकी वर्ष एकमेकांसोबत काम केलं, भेटी गाठी होत असतात. आमचं त्यांच्यासोबत वैयक्तिक भांडण नाही, राजकीय आहे.चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चहा पिण्यासाठी एकत्र यायचं आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी अधिक भाष्य करणं टाळलं.