Sanjay Raut : संजय राऊत हक्कभंग प्रकरण राज्यसभेकडे पाठवणार असल्याची माहिती
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग कारवाईचा चेंडू आता केंद्राच्या कोर्टात गेला आहे. विधानसभेकडून हक्कभंग प्रकरण आता राज्यसभेत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राऊतांवरील कारवाई संदर्भात राज्यसभेचा अभिप्राय घेण्यात येणार आहे. आजच हक्कभंग प्रकरण विधानसभेकडून राज्यसभेकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळं आता राज्यसभेच्या अभिप्रायाकडं संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Tags :
Rajya Sabha Ball MP Sanjay Raut Action Thackeray Group From Assembly Rights Violation Action In Center Court Rights Violation Case