Sanjay Raut : संजय राऊत यांनी मानले Sharad Pawar यांचे आभार

Continues below advertisement

मुंबई :  संजय राऊत एकटे पडले आहेत का? हा प्रश्न सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा ठरला आहे.  कारण राज्यातलं सरकार बनवण्यात राऊतांचा मोठा वाटा आहे पण याच राऊतांसाठी महाविकास आघाडी सध्या शांतता दिसत आहे. 2019 सत्तासंघर्षाच्या काळात  संजय राऊत शिवसेनेसाठी ढाल बनून उभे होते. रोज रोजच्या पत्रकार परिषदांमध्ये एकच वाक्य ठणकावून सांगायचे ते म्हणजे मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. एक वेळ अशी आली की महाविकास आघाडीचं जुळलं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.  शिवसेनेसाठी ढाल बनून उभे राहाणारे राऊत हळूहळू महाविकास आघाडीची ढाल बनू लागले आणि केंद्र असो किंवा राज्यातला विरोधी पक्ष भाजपला प्रत्युत्तर देऊ लागले 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram