तुम्ही राष्ट्रपतींकडे जाऊन धुणीभांडी करता का? मुनगंटीवारांच्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा टोमणा
विधिमंडळाचं पाच दिवसांचं हिवाळी अधिवेशन अखेर काल संपलं. सरकार बरखास्त करुन दाखवलं नाहीतर नाव बदला असं खुलं आव्हानच भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी अखेरच्या दिवशी दिलं. राज्यपालांनी परवानगी न दिल्यामुळे या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडणूक होऊ शकली नाही. अखेरच्या दिवशी विरोधक आणि सत्ताधारी काही मुद्यांवरून आमनेसामने आले. त्यातच मुनगंटीवारांनी ठाकरे सरकारला दिलेल्या आव्हानामुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आलंय. यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी जोरदार समाचार घेतला.