Nitesh Rane यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या निर्णय, नितेश राणेंना अटक की जामीन?
Continues below advertisement
Nitesh Rane : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी होणार आहे. कोर्टातला आजचा युक्तिवाद संपला आहे. दरम्यान, नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. नितेश राणे यांच्यावर शिवसेनेच्या संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ते पोलिसात हजर झालेले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूकडून कोर्टात सुनावणी सुरू होती.
Continues below advertisement