Sanjay Raut on NCB : एनसीबीनं आरोप जरी फेटाळले असले तरीही चोर स्वतःला कधी चोर म्हणत नाही
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एनसीबी आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील सिनेसृष्टी राज्याबाहेर हलवायची आहे त्यासाठी या सुपाऱ्या वाजत होत्या... तर केंद्रीय तपास यंत्रणेचे मालक हे भाजपच आहे असा आरोप राऊतांनी केला आहे. एनसीबीनं आरोप जरी फेटाळले असले तरीही चोर स्वतःला कधी चोर म्हणत नाही, अशातला हा प्रकार असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. गुजरातमध्ये ड्रग्ज सापडले त्याची चौकशी केली जात नाही पण महाराष्ट्राला मात्र बदनाम केलं जातं. त्याचबरोबर या केंद्रीय यंत्रणाचे गळ्यात मारलेले लोंढे बाहेर काढले पाहिजेत अशीही टीका संजय राऊतांनी एबीपी माझाशी बोलताना केलीय...
Tags :
Sanjay Raut Aryan Khan Cruise Drugs Case Kiran Gosavi Cruise Drugs Prabhakar Sail NCB Press Note