Sanjay Raut : विधानसभा दिवाळीनंतर, संजय राऊत म्हणाले, निवडणूक आयोगाला खोके दिले का?

Continues below advertisement

Sanjay Raut : विधानसभा दिवाळीनंतर, संजय राऊत म्हणाले, "निवडणूक आयोगाला खोके दिले का?"

Sanjay Raut on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात वन नेशन वन इलेक्शनवर (One Nation One Election) भाष्य केले होते. त्यानंतर शुक्रवारी निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. 2019 साली हरियाणा आणि महाराष्ट्रात एकाच वेळी निवडणुका पार पडल्या होत्या. यंदा मात्र दोन्ही राज्यात वेगवेगळ्या निवडणुका पार पडणार आहे. महाराष्ट्रात दिवाळीआधी राज्यात निवडणुका पार पडतील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता दिवाळीनंतर महाराष्ट्रातील निवडणुका पार पडतील, असे स्पष्ट संकेत निवडणूक आयोगानेच दिले आहेत, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय.  

संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छाती पुढे करून सांगतात की, वन नेशन वन इलेक्शन. ते चार राज्यातल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत. झारखंड, हरियाणा, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र या राज्याच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही ते वन नेशन वन इलेक्शनच्या वल्गना करत आहेत. खोटारडे कुठले, लोकांना मूर्ख बनवताय. महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये तुम्हाला हरण्याची भीती आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram