Sanjay Raut Speech : कसाबचं बॅरेक ते ED ला बूच!संजय राऊतांची जबरदस्त फटकेबाजी

Sanjay Raut Speech : कसाबचं बॅरेक ते ED ला बूच!संजय राऊतांची जबरदस्त फटकेबाजी

Sanjay Raut On Eknath Shinde मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी संवाद साधत एक खळबळजनक विधान केलं आहे. ईडीकडून अटक होण्याआधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मला फोन आला होता. मी वरती बोलू का?, गृहमंत्री अमित शाह यांना बोलू का?, असं एकनाथ शिंदे मला फोन करुन म्हणाले. यावर काहीच गरज नाही. तुम्ही माझ्याबद्दल वरती बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही, असं संजय राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाले, असा गौप्यस्फोट स्वत: संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना केला. संजय राऊतांचं आज नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन आहे. या पुस्तकात देखील संजय राऊतांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola