Sanjay Raut Special Report : ठाकरे सावध, शिंदेंचा फटका; राऊतांच्या मनात नेमकं काय ?
Sanjay Raut Special Report : ठाकरे सावध, शिंदेंचा फटका; राऊतांच्या मनात नेमकं काय ? संजय राऊत बोलले आणि त्यावरून चर्चेच वादळ उठलं नाही, असं क्वचितच घडतं... कधी वादग्रस्त वक्तव्यांनी राऊतांवर विरोधक तुटून पडतात तर कधी आपल्या वक्तव्यांनी महाविकास आघाडीलाच ते अंगावर घेतात... आताही संजय राऊतांनी मुख्यमंत्रिरदावरून नवं वक्तव्य केलंय... ज्यावरून फक्त सत्ताधारीच नाहीत तर महाविकास आघाडीचे नेतेही चक्रावून गेलेत... पाहूयात... ठाकरे गटाची मुलुखमैदानी तोफ असलेल्या संजय राऊतांनी आज एक नवी काडी टाकली आणि आरोपांचा वणवा पेटला... मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नसेल तर, बिनचेहऱ्याची निवडणूक कशी लढायची, असा सवाल राऊतांनी केलाय. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे काम पाहिले असून, मविआला जे यश मिळालं त्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा परिणाम असल्याची पुस्तीही त्यांनी जोडलीय. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पदरात महाराष्ट्राने मतांचं चांगलं दान दिलं. त्यामुळे संजय राऊतांचा आत्मविश्वास वाढलाय. त्यातूनच त्यांनी हे वक्तव्य केल्याचा कयास काढला जातोय. मात्र, त्यासोबतच महाविकास आघाडीवर दबाव टाकण्याचा त्यांचा हेतू असल्याचंही राजकीय विश्लेषक सांगतायत. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आधीच जाहीर व्हावा, ही उद्धव ठाकरेंचीच भूमिका असण्याची शक्यता काँग्रेसला आणि शरद पवारांना जास्त जागा मिळाल्यास त्यांच्या पालखीचे भोई बनावे लागेल याची धास्ती राऊतांना असू शकते ऐनवेळी कुणाची मुख्यमंत्रिपदाची महत्वाकांक्षा जागृत झाल्यास काय होतं? याचा राऊतांना चांगलाच अनुभव गेल्या वेळेसारखंच उद्धव ठाकरेंचा चेहरा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मान्य असेल असं राऊतांनी गृहित धरलेलं असू शकतं काँग्रेसकडे मुख्यमंत्रिपदासाठी सर्वमान्य चेहरा नाही असं राऊतांना वाटत असेल शरद पवारांना या वयात मुख्यमंत्रिपदाचा मोह नाही, सुप्रिया सुळे दिल्लीतच जास्त रमतील, असा राऊतांचा समज असेल