Sanjay Raut : 'गृहखातं अजगरासारखं निपचित पडलंय', Sanjay Raut यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीकेची झोड

Continues below advertisement
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली आहे. 'गृहखातं अजगराप्रमाणे निपचित पडलेलं आहे,' अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गृहखात्यावर केली. राज्यातील महिला, तरुण आणि वृद्ध सुरक्षित नसून सरकारची प्रशासनावर पकड नसल्याचा आरोपही त्यांनी केला. राऊतांच्या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले. हे उद्धवजींचं सरकार नाही, पालघरमध्ये साधूंची हत्या झाली तेव्हा तुमचं सरकार गप्प होतं, हे देवाभाऊंचं कायद्याचं राज्य आहे, असं म्हणत नवनाथ बन यांनी जुन्या प्रकरणांची आठवण करून दिली. फलटण प्रकरणात (Phaltan Case) योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल आणि कुणालाही सोडले जाणार नाही, असेही बन यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola