Sanjay Raut : 'गृहखातं अजगराप्रमाणे निपचित पडलेलं आहे', फडणवीसांवर हल्लाबोल
Continues below advertisement
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'गृहखातं अजगराप्रमाणे निपचित पडलेलं आहे,' असं म्हणत राऊत यांनी फलटणमधील महिला डॉक्टरची आत्महत्या आणि मुंबईतील तरुणीच्या हत्येचा उल्लेख करत सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. देवेंद्र फडणवीस पोलीस यंत्रणेचा वापर केवळ विरोधी पक्षांवर पाळत ठेवण्यासाठी आणि त्यांच्याविरोधात कारस्थान करण्यासाठी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 'बाहेरून आलेल्या नेत्यांमुळे जुने कार्यकर्ते बाजूला सारले जात आहेत' या वक्तव्याला दुजोरा देत, राऊत यांनी सध्याचा भाजप हा 'डुप्लिकेट' असल्याची टीका केली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र येणार असून, महायुतीला पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच ते एकत्र लढत असल्याची भीती त्यांना वाटत आहे, असा दावाही राऊत यांनी केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement