Sanjay Raut : 'राफेलच्या वेगाने फाईल, रहस्य जमिनीखाली', BJP कार्यालयावरून हल्लाबोल
Continues below advertisement
शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. मुंबईतील मरीन लाईन्स येथील मराठी भाषा भवनाचे काम भूमिपूजन होऊनही रखडले असताना, दुसरीकडे भाजपच्या पंचतारांकित कार्यालयाची फाईल वेगाने पुढे सरकत असल्याचा आरोप त्यांनी केला. 'पण भारतीय जनता पक्षाच्या पंचतारांकित हेडक्वार्टरची फाईल ज्या राफेलच्या वेगाने हलली ते रहस्य त्या जमिनीखाली दडलेले आहे,' असे राऊत म्हणाले. दिवाळी झाली तरी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदतीची फाईल पुढे सरकलेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गृहमंत्री भाजपच्या नव्या भव्य कार्यालयाच्या भूमिपूजनासाठी येत असल्याचे सांगत, या कामाला मिळालेल्या प्रचंड गतीमागे एक मोठे रहस्य दडले आहे आणि ते भूमिपूजनावेळी बाहेर येईल, असा टोलाही त्यांनी लगावला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement