Pune Jain Bording Land Deal: बिल्डरची माघार, तरीही जैन गुरू आंदोलनावर ठाम, ट्रस्टींवर निशाणा

Continues below advertisement
पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेचा वाद चिघळला असून बिल्डर विशाल गोखले यांनी हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 'सर्वात मोठे महादोषी, महाअपराधी हे ट्रस्टी आहेत, जोपर्यंत त्यांना शिक्षा मिळत नाही आणि संस्था त्यांच्या ताब्यातून सुटत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील,' असा थेट इशारा जैन गुरूंनी दिला आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर आणि जैन धर्मीयांच्या भावना दुखवू नयेत म्हणून आपण माघार घेत असल्याचं विशाल गोखले यांनी ईमेलमध्ये म्हटलं आहे. त्यांनी व्यवहारातील २३० कोटी रुपये परत देण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे, ट्रस्टींना पदावरून हटवल्याशिवाय आणि सरकारकडून क्लीन चिट मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका जैन समाजाने घेतली आहे. या प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर हे देखील आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola