Sanjay Raut Home Reki | संजय राऊतांच्या घराबाहेर रेकी, कारण काय? Special Report
Continues below advertisement
Sanjay Raut Home Reki | संजय राऊतांच्या घराबाहेर रेकी, कारण काय? Special Report संजय राऊत... ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार... शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडाआधी आणि बंडानंतरही उद्धव ठाकरेंच्या पक्षाची भूमिका ठाम मांडणारे शिलेदार. सत्ताधारी महायुतीवर बरसणारी महाविकास आघाडीची बुलंद तोफ अशीही राऊतांची राष्ट्रीय राजकारणात ओळख आहे. राऊतांची वक्तव्य ही कधी रोखठोक असली तरी कित्येकदा ती वादाची ठिणगी पाडणारी असतात. पण त्याच संजय राऊतांवर कुणीतरी पाळत ठेवतंय का? हा प्रश्न विचारण्याचं कारण त्यांच्या मुंबईतल्या भांडुप येथील बंगल्याची दोन अज्ञात बाईकस्वारांनी रेकी केल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळं संजय राऊतांचे भाऊ आणि आमदार सुनील राऊतांनी त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.
Continues below advertisement