Sanjay Raut On Communal Riots : देशभरातल्या दंगली भाजपनं घडवून आणल्या : संजय राऊत
abp majha web team
Updated at:
19 Apr 2022 11:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशभरात सुरु झालेल्या दंगली आणि हिंसाचारावरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. भाजपककडून देशात हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे. 'देशभरामध्ये जे दंगे सुरू आहेत हे देशातील सत्ताधारी पक्ष भाजपने प्रायोजिक केले आहेत. याआधीही जनतेनं रामनवमी आणि हनुमान जयंती सारखे सण साजरे केले आहेत. तेव्हा दंगली झाल्या नाहीत. दिल्ली हे राज्य केंद्रशासित आहेत. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था केंद्र सरकारकडे आहे', असं म्हणत राऊतांनी गंभीर आरोप केले आहेत.