Sanjay Raut Bail Application : संजय राऊतांचा मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज ABP Majha

मनी लॉंड्रिंग प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात त्यांनी हा अर्ज दाखल केला आहे... आणि यावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. ईडीनं खासदार संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक  केली आहे..खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने 19 सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्या राऊतांना जामीन मिळणार का याकडे ठाकरे गटाचं लक्ष आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola