Sanjay Raut : नारायण राणेंची दोन्ही मुलं नेपाळी, राऊत राणेंवर पहिल्यांदा बरसले

Continues below advertisement

Sanjay Raut : नारायण राणेंची दोन्ही मुलं नेपाळी, राऊत राणेंवर पहिल्यांदा बरसले खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदाच नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली. नालायक शब्दावरुन राज्याचे राजकारण तापले होते. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राणे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर नारायण राणेंना अटक झाली, त्यासारखीच अटक उद्धव ठाकरेंना होणार का? अशी चर्चा रंगली होती. आता नाराणय राणे यांच्या टीकेला संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलेय, त्याशिवाय त्यांच्या मुलावरही निशाणा साधलाय. काही दिवसांपूर्वी येथे नारायण तातू राणे आले होते. येथे जोरदार भाषण केले, माझ्याविरोधात शिवीगाळ केली, गुन्हा दाखल केला का? अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अतिशय घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली. गुन्हा दाखल केला ? मंत्री आहे म्हणून कारवाई नाही का? भाजप आणि गद्दार गटाचे असे अनेक नेते शिव्या घालतात.. त्यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत. अटक नाही. पण दत्ता दळवी यांनी एक जनभावना व्यक्त केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, अटक केली, असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram