Sanjay Raut: सोमय्यांवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली ABP Majha
abp majha web team
Updated at:
20 Feb 2022 11:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजकारण करताना आणखी किती खालची पातळी गाठणार असा प्रश्न आता महाराष्ट्र विचारु लागलाय.. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक करणाऱ्या नेत्यांची भाषा देखील आता शिवराळ झालीय.. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत दररोज माध्यमांशी संवाद साधताना सोमय्यांवर आरोपांच्या फैरी झाडतात... मात्र आज सोमय्यांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... सोमय्यांबद्दल शिवसेना खासदार संजय राऊतांनी अपशब्द वापरलेत...नुसते अपशब्दच वापरले नाहीत, तर त्यावर ठाम असल्याचंही राऊत म्हणालेत...