Sanjay Raut Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, मनसैनिकांनी दिलं आमंत्रण

Continues below advertisement

Sanjay Raut Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, मनसैनिकांनी दिलं आमंत्रण


राज ठाकरेंकडून नेमकी भाषा कशी असावी आणि राजकारणात ती भाषा कशी वापरावी याची माहिती घेण्याकरता संजय राऊतांनी राज ठाकरेंची सभा येऊन ऐकावी यासाठी सभेच्या समोर ही मनसे सैनिकांनी खुर्ची ठेवण्यात आलीय 


हे ही वाचा...

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना महायुती आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष कमालीचा तीव्र झाला आहे. याचे प्रत्यय सोमवारी मुंबईच्या चांदिवली परिसरात आला. या परिसरातून सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा ताफा जात होता. चांदिवली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नसीम खान हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या कार्यालयाबाहेरुन एकनाथ शिंदे यांचा ताफा जात होता. तेव्हा काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी 'गद्दार, गद्दार'च्या घोषणाही देण्यात आल्या. तसेच संतोष कटके या तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून अपशब्द वापरले. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या संतापाचा पारा चढलेला पाहायला मिळाला.

नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्र्यांचा रौद्रावतार कॅमेरामध्ये चित्रित झालेला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संतोष कटके यानी काल मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला आणि त्याने गद्दार गद्दार अशा घोषणा दिल्या होत्या. गद्दार घोषणा देणाऱ्यांवरती मुख्यमंत्री शिंदे हे त्यानंतर संतापले.  संतोष कटके जो कार्यकर्ता होता त्याने काही अपशब्द मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी वापरले. त्यामुळे मुख्यमंत्री प्रचंड चिडले. ते गाडीतून रागातच खाली उतरले आणि समोर असलेल्या नसीम खान यांच्या कार्यालयात चालत गेले. तेथील काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना, 'ऐसा सिखाते हे क्या आप लोग?', अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी जाब विचारला.  यानंतर पोलिसांनी संतोष कटके आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, नंतर त्यांना सोडून देण्यात आले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram