Maharashtra Politics: 'गणेश नाईकचा अंतिम विजय ठरला आहे', Eknath Shinde गटात शीतयुद्ध, Sanjay Raut यांचा दावा

Continues below advertisement
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'परिणती अशी आहे की गणेश नाईकचा अंतिम विजय ठरला आहे,' असं ठाम मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे. गणेश नाईक हे कसलेले पैलवान असून त्यांनी पक्ष बदलले असले तरी कधीही संयम सोडला नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी गणेश नाईक यांचे कौतुक केले आहे. ठाणे आणि नवी मुंबईतील वर्चस्वावरून शिंदे आणि नाईक यांच्यात संघर्ष सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अनेक महिन्यांपासून आहे. याच पार्श्वभूमीवर, संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत वादावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola