Sanjay Raut PC FULL : देख लेंगे,मौका आएगा तब ठोक देंगे; राऊतांची धडाकेबाज पत्रकार परिषद

मुंबई : युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याला भाजपकडून (BJP) कडाडून विरोध करण्यात आला.  रामा हॉटेलबाहेर भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आमनेसामने आले होते. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच दिशा सालीयनचे फोटो असणारे पोस्टर घेऊन यावेळी आदित्य ठाकरेंचा निषेध करण्यात येत आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाकडे सध्या काही काम नाही. हा पक्ष भ्रमिष्ट पक्ष आहे. या राज्यात त्यांचे सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात वाढ झाली आहे. बदलापूरची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात मागच्या आठ दिवसात 27 ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाले. त्यांना याबाबत प्रश्न विचारले की, ते बनावट प्रकरणे निर्माण करतात. जे स्वतःला भाजपचे कार्यकर्ते म्हणून घेतात ते कार्यकर्ते नसून ते पगारी नोकर आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola