Amravati: भाजपच्या माध्यमातून दंगली घडवल्या जात असतील तर गृह मंत्रालय सक्षम : Sanjay Raut :ABP Majha

Continues below advertisement

भाजप जातीय दंगली, धार्मिक दंगलीशिवाय राजकारण करुच शकत नाही, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. भाजपच्या माध्यमातून दंगली घडवल्या जात असतील तर गृह मंत्रालय सक्षम आहे, सरकार सक्षम आहे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचं मोठं कारस्थान आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या माध्यमातून सरकारला काय चरोट्या उठत नाही, आम्ही मनाने आणि कामाने खंबीर आहोत. आता दंगली घडवून अस्थिरता निर्माण करण्याचं यांचं कारस्थान दिसतंय, मराठवाड्यात, औरंगाबादच्या काही भागात, अमरावतीत असे प्रकार झाले, हे ठरवून झालं आहे. या राज्यातील विरोधी पक्षाने महाराष्ट्राल असा प्रकारे चूर लावण्याचा प्रकार करु नये, महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला धक्का लावू नका असंही संजय राऊत म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram