Sanjay Raut : अपात्रतेची टांगती तलवारीमुळे मंत्रिपदाची शपथ घेण्याचा अधिकार राहिलेला नाही : राऊत
Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसात एकापेक्षा एक मोठे भूकंप होत आहेत. शिवसेनेतून बंड करत 50 आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. खासकरुन शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्या ट्वीटनंतर ही चर्चा जास्तच जोरात होऊ लागली आहे. यावर आता खुद्द खासदार संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मंत्रिमंडळावरुन बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत म्हणाले की, आमचे मंत्री सात होते, दोघे नव्हते. इथे गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट दोघांमध्ये होत आहे. भाजपमध्ये घटना तज्ञ, कायदे तज्ञ यांची फार मोठी फौज आहे. त्याची पीसं काढतील. पण यात नैतिकता कुठे आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. संजय राऊत म्हणाले की, तुमच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे शपथविधी करू शकला नाही. यांना मंत्रिपदाची शपथ घेण्याचा अधिकार राहिलेला नाही. घटना तुडवायची ठरवलं असेल तर मग तुमची मर्जी असंही राऊत म्हणाले.