Sanjay Raut : Raosaheb Danve काल काय म्हणाले हे त्यांना आज आठवतही नसेल
Continues below advertisement
Sanjay Raut on Raosaheb Danve Statement : महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) 25 आमदार संपर्कात असून निवडणुका येऊ द्या, एक एक भाजपच्या वाघोरीत येतील, असं म्हणणाऱ्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे. माझ्याकडे अशी माहिती नाही की, रावसाहेब दानवे भांग पितात. रावसाहेब दानवे भांग वैगरे पित नाहीत, असं म्हणत संजय राऊतांनी दानवेंना कोपरखळी मारली आहे. तसेच, भाजपचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच, असंही संजय राऊतांनी सांगतिलं आहे.
Continues below advertisement