Sanjay Raut on Raj Uddhav : मला राज ठाकरेंचा फोन आला, म्हणाले... संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
Sanjay Raut on Raj Uddhav : मला राज ठाकरेंचा फोन आला, म्हणाले... संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) पुरस्कृत मोर्चा 5 जुलैला तर 7 तारखेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीच्या एल्गाराची घोषणा केली होती. हिंदीसक्तीविरोधात ठाकरे बंधूंचे दोन वेगवेगळे मोर्चे काढण्याऐवजी एकत्रित एकच मोर्चा काढावा, यासाठी प्रयत्न सुरु होते. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही एक मो यासाठी हालचाली सुरु होत्या. यानंतर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रतील शाळात हिंदीसक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी एक्स पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे हिंदीसक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचं निश्चित झालं आहे.