Sanjay Raut on Narayan Rane : नारायण राणे दहा पक्ष बदलणारे नेते, घाबरण्याचं कारण नाही ABP Majha

Continues below advertisement

Rane Vs Raut : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातील शाब्दिक युद्ध थांबयाचं नाव घेत नाही. नारायण राणे यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर प्रहार केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याबाबत संजय राऊत जे बोलायचा ते मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे, त्यानंतर रश्मी आणि उद्धव ठाकरे संजयला चप्पलेने झोडतील, अशी जहरी टीका राणे यांनी केली. तसंच संजय राऊत जिथे बोलावतील तिथे सुरक्षा सोडून यायला तयार आहे, असंही त्यांनी म्हटलं. नारायण राणे मुंबईत (Mumbai) माध्यमांशी बोलत होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram