Sanjay Raut on Goa Election 2022: गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार ABP Majha

Continues below advertisement

महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न अयशस्वी झालाय. गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीसोबत जाण्यास काँग्रेसने नकार दिलाय. त्यामुळे गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूका लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना गोव्यात एकत्र निवडणूका लढवतील. सर्व ४० जागांवर आम्ही निवडणूका लढवणार नाही, पण महत्वाच्या जागांवर आम्ही उमदेवार उभे करणार आहोत. उद्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहोत. त्यानंतर काही दिवसानंतर दुसरी यादीही जाहीर करण्यात येईल अशी माहिती प्रफुल पटेल यांनी यावेळी दिली. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. काँग्रेसच्या हट्टापायी महाविकास आघा़डीचा प्रयोग होऊ शकला नसल्याची खंतही शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram