ABP News

Sanjay Raut On Amit Shah : काश्मिरात जवान शहीद, अमित शाहांचा राजीनामा घ्या- संजय राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut On Amit Shah : काश्मिरात जवान शहीद, अमित शाहांचा राजीनामा घ्या- संजय राऊत

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दररोज जवान शहीद होत आहेत, असं म्हटलं.  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचं सरकार याला जबाबदार आहे, असं संजय राऊत म्हणाले. अमित शाह पूर्ण ताकद आमच्यासोबत लढण्यासाठी ताकद लावत आहेत.  यामुळं दहशतवादी सुटलेत, जम्मू काश्मीर असो की मणिपूर असो अमित शाह जबाबदार आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. अमित शाह यांनी राजीनामा द्यायला हवा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा घ्यावा, असं संजय राऊत म्हणाले. थोडी जरी नैतिकता असेल तर अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केलीय. जम्मू काश्मीरमध्ये दोडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये एका कॅप्टनसह चार जवान शहीद झाले होते. यामुद्यावरुन संजय राऊत यांनी केंद्र सरकावर हल्ला चढवला.

अमित शाह पूर्णपणे अयशस्वी गृहमंत्री आहेत.  देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष नाही.  देशाच्या सुरक्षेकडे लक्ष नाही फक्त निवडणूक लढा, निवडणूक जिंका, इथं तिथं दबाव आणा , आपल्या विरोधकांना संपवा असा प्रकार सुरु आहे. देशाच्या विरोधकांना संपवा, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं. तुमच्यात हिम्मत असेल तर आपले जवान दररोज शहीद आहेत. तुम्ही कीर्तीचक्र द्याल, पण यानं काही होत नाही. आम्ही त्या जवानांच्या बलिदानाला शहादत म्हणू पण दररोज जवान शहीद होत आहेत, असं संजय राऊत म्हणाले. जवानांच्या हत्येला मोदी शाहांचं सरकार जबाबदार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. 

सर्व भ्रष्ट लोक फक्त अजित पवार नाही,एकनाथ शिंदे, भावना गवळी, प्रताप सरनाईक, रवींद्र वायकार असो, काही लोक जिंकवले गेले. अपघातानं पैशाच्या ताकदीनं जिंकले, असं संजय राऊत म्हणाले. मात्र, सर्व भ्रष्टाचारी लोक आपल्यासोबत घेतल्यानं आरएसएस आणि भाजप पूर्णपणे भ्रष्ट आणि बदनाम झाले, असा आरोप संजय राऊत यांनी केला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram